अकोला – येत्या दि. 7 फेब्रुवारी 2024 (बुधवार) रोजी त्यागमुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची 126वी जयंती संपूर्ण देशभरात साजरी होणार आहे. मागील वर्षी शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती हर्ष उल्हासात पार पडली. त्याची सांगता म्हणून, अकोला येथील ऐतिहासीक संस्था डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय उत्कर्ष प्रतिष्ठान, खडकी अकोला द्वारा भव्य दिव्य रमाई जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्याचे योजिले आहे.
या जयंती कार्यक्रमातून रमाईचे जीवन, त्याग आणि रमाईचा खडतर प्रवास सर्वांना माहिती व्हावा याकरीता या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमात सर्वसामान्य गृहिणीनींसोबत विविध क्षेत्रातील कर्मचारी भगीनींनी, रमाई जयंतीसाठी “एक दिवस” सुटी काढून, (बुधवार दि. 7फेब्रु. 2024) सोबत रमाईचा वेशभूषा धारण करून यावे. (चेक्सचं निळ लुगडं आणि पांढरं ब्लाऊज)
अशाप्रकारे रमाईजयंती उत्सवाचे आयोजन संस्थेद्वारे करन्यात आहे. सदरील कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8.30 वा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय उत्कर्ष प्रतिष्ठान, प्रबोधन नगर, खडकी अकोला, येथे होईल.
तरी सर्व संस्थेच्या सन्माननीय आजीव सदस्य, धम्मदानदाते, विशेष धम्मदान दाते, संचालक, बचतगट सभासद व प्रतिनिधी, समाजन्यायपत्र वाचक, व सर्व उपासक-उपासिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय उत्कर्ष प्रतिष्ठान, द्वारा करण्यात आले आहे.