मुंबई : सणासुदीचा काळ सुरू आहे. या काळात भारतात मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली जाते. हे पाहता टाटा मोटर्सने ऑक्टोबरमध्ये आपल्या अनेक पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कारवर खास ऑफर सादर केल्या आहेत. कंपनीच्या या फेस्टिव्ह स्किममध्ये टियागो, टिगोर, अल्ट्रोज, नेक्सन, कर्व्ह, हॅरियर आणि सफारीसारख्या मॉडल्सचा समावेश आहे. खरंतर सूटची रक्कम कारचं व्हेरिएंट, फ्यूल टाइप आणि ग्राहकांच्या पात्रतेच्या हिशोबाने वेगवेगळी आहे. सर्वात जास्त फायदा काही इलेक्ट्रिक कारवर मिळतंय.
