
पिंपरी : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भावानेच स्वतःच्या सख्ख्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाकड येथील एका लेबर कॅम्पमध्ये हा प्रकार घडला. भावानं बहिणीच्या डोक्यात पुट्टी बनवण्याचं लोखंडी मशिन मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वाकड पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत आरोपी भावाला बेड्या ठोकल्या आहेत.
नंदलाल सुदर्शन सहानी (वय ३४, रा. ए.एन.पी. अल्टिमस लेबर कॅम्प, वाकड) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. ३० वर्षीय बहिणीच्या (रा. वाकड) फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. ही घटना १५ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाकड येथील ए.एन.पी. अल्टिमस लेबर कॅम्पमध्ये घडली. आरोपी नंदलाल सहानी आणि त्याच्या ३० वर्षीय बहिणीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
