माचो इनरवेअरच्या जाहिरातीवरून वादाची शक्यता; बौद्ध भिक्खूंच्या अवमानाचा आरोप
ASCI कडे तक्रार करण्याची भारतीय बहुजन मुस्लिम संघटनेची तयारी; जाहिरात बंद करून जाहीर माफीची मागणी करणार
प्रबुद्ध टीव्ही, प्रतिनिधी | मुंबई

माचो इनरवेअरच्या एका जाहिरातीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या जाहिरातीत बौद्ध भिक्खूंचा अवमान करण्यात आल्याचा आरोप भारतीय बहुजन मुस्लिम संघटनेने केला आहे. या प्रकरणी जाहिरात मानक परिषदेकडे (ASCI) तक्रार करण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे.
भारतीय बहुजन मुस्लिम संघटनेचे मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन भाऊसाहेब निकाळजे यांनी यासंदर्भातील माहिती प्रबुद्ध टीव्हीला दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जाहिरातीत बौद्ध भिक्खूंच्या वेशभूषेची आणि प्रतिमेची खिल्ली उडवण्यात आल्याचा संघटनेचा आक्षेप आहे. त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात आणि सामाजिक सलोख्यावर परिणाम होऊ शकतो, अशी संघटनेची भूमिका आहे.
या प्रकरणी संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक आयु. स्वप्निल सुभा महेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ASCI कडे लेखी तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
संघटनेच्या वतीने संबंधित जाहिरात सर्व माध्यमांमधून तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करावी, जाहिरातदार व निर्मात्यांवर नियमानुसार कारवाई करावी आणि कंपनीने सार्वजनिकरीत्या माफी मागावी, अशा मागण्या तक्रारीत करण्यात येणार आहेत.
या भूमिकेला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन फुलमाळी, राष्ट्रीय महासचिव अतुल खेडेकर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. माणिकराव सुरडकर यांचाही पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संघटनेकडून अद्याप ASCI कडे अधिकृत तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळालेली नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर ASCI आणि संबंधित कंपनीची भूमिका काय असते, याकडे लक्ष लागले आहे.
जाहिरात
वर्षावास आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
प्रबुद्ध टीव्हीद्वारे आयोजित
राज्यस्तरीय ऑनलाइन
धम्मज्ञान महापरीक्षा – 2026
धम्मविषयक ज्ञान वाढविण्यासाठी, वाचनाची सवय विकसित करण्यासाठी आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम.
परीक्षेची तारीख
01 नोव्हेंबर 2026
रविवार
परीक्षेची वेळ
दु. 01:30 ते 2:10
40 मिनिटे
नोंदणी शुल्क
₹120/-
अंतिम तारीख 25 ऑक्टोबर
परीक्षेचा अभ्यासक्रम
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील प्रथम चार खंडांवर आधारित प्रश्न.
40 प्रश्न | 200 गुण | बहुपर्यायी (MCQ) स्वरूप
एकूण पारितोषिक रक्कम
₹50,000/-
एकूण 7 पारितोषिके
पारितोषिकांचा तपशील
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी • खुली स्पर्धा • वयाचे बंधन नाही • मराठी भाषा

