उमरखेडमध्ये ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

डीजेमुक्त ढोल-ताशांच्या मिरवणुकीत हजारोंचा सहभाग; बुद्ध, धम्म आणि सामाजिक एकतेचा संदेश
उमरखेड, जि. यवतमाळ, दि. २० ऑक्टोबर २०२६ : यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहराच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य मिरवणुकीत हजारो बौद्ध बांधव आणि नागरिक सहभागी झाले. पारंपरिक ढोल-ताशांचा गजर आणि ‘जय भीम’, ‘नमो बुद्धाय’च्या जयघोषाने परिसर धम्ममय झाला होता.
उत्सवाची सुरुवात सकाळी १० वाजता तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. भंते कीर्ती बोधी, माजी सैनिक शंकरराव दिवेकर, माजी नगरसेविका हिराबाई दिवेकर आणि रमामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा उषाताई इंगोले यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महिलांनी पंचशील ध्वजगीत सादर केले. उपस्थितांनी सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण केले.

सायंकाळी ६ वाजता डीजेमुक्त ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी अभिवादन केले. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या मिरवणुकीतून समता, बंधुता आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
उत्सवाच्या आयोजनासाठी समितीने अवघ्या आठ दिवसांत तयारी केली होती. समितीचे अध्यक्ष पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, उपाध्यक्ष कुमार केंद्रेकर, सचिव आकाश श्रवले, कोषाध्यक्ष संतोष इंगोले, कार्याध्यक्ष शुद्धोधन दिवेकर व तुषार पाईकराव, तसेच संघटक अजय दिवेकर आणि अंकुश दिवेकर यांनी परिश्रम घेतले. उत्सव शांततेत पार पडण्यासाठी उमरखेड पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या उत्सवातून भगवान बुद्धांचा शांतीचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता व बंधुतेचे विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जाहिरात
वर्षावास आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
प्रबुद्ध टीव्हीद्वारे आयोजित
राज्यस्तरीय ऑनलाइन
धम्मज्ञान महापरीक्षा – 2026
धम्मविषयक ज्ञान वाढविण्यासाठी, वाचनाची सवय विकसित करण्यासाठी आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम.
परीक्षेची तारीख
01 नोव्हेंबर 2026
रविवार
परीक्षेची वेळ
दु. 01:30 ते 2:10
40 मिनिटे
नोंदणी शुल्क
₹120/-
अंतिम तारीख 25 ऑक्टोबर
परीक्षेचा अभ्यासक्रम
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील प्रथम चार खंडांवर आधारित प्रश्न.
40 प्रश्न | 200 गुण | बहुपर्यायी (MCQ) स्वरूप
एकूण पारितोषिक रक्कम
₹50,000/-
एकूण 7 पारितोषिके
पारितोषिकांचा तपशील
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी • खुली स्पर्धा • वयाचे बंधन नाही • मराठी भाषा

