प्रत्येक बौद्धाच्या घरात असावा ‘BUDDHISM A-Z’ चार्ट; प्रा. धनराज इंगोले यांचा शैक्षणिक उपक्रम

वाशिम : इंग्रजी अक्षरे शिकतानाच मुलांना बुद्ध, धम्म आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित व्यक्ती, स्थळे व प्रतीकांची माहिती मिळावी, या उद्देशाने प्रा. धनराज इंगोले यांनी ‘BUDDHISM A-Z’ हा विशेष चार्ट तयार केला आहे. ‘A for Ambedkar, B for Buddha आणि C for Chaityabhoomi’ या संकल्पनेतून तयार केलेला हा चार्ट मुलांना इंग्रजी अक्षरांसोबत बौद्ध धम्माची ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे.
पारंपरिक पद्धतीने इंग्रजी अक्षरे शिकण्याबरोबरच आपल्या वैचारिक वारशाची आणि बौद्ध संस्कृतीची माहिती मुलांना मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. घराच्या भिंतीवर हा चार्ट लावल्यास मुलांना दररोज त्यातील माहिती पाहता येईल आणि बुद्ध, धम्म व आंबेडकरी चळवळीविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होऊ शकते.

चार्टमधील व्यक्ती, स्थळे आणि प्रतीकांविषयी सविस्तर माहिती देणारे ‘BUDDHISM A-Z’ हे इंग्रजी पुस्तक प्रा. धनराज इंगोले यांनी संपादित केले असून, ते ज्ञानपथ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. चार्टच्या माध्यमातून प्राथमिक ओळख, तर पुस्तकाच्या मदतीने अधिक सखोल माहिती मिळवता येते.
बुद्ध, धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व आहे. मुलांमध्ये ऐतिहासिक जाणीव, सामान्य ज्ञान आणि वाचनाची आवड विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो. बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने बौद्ध विहारांना हा चार्ट दान करण्यात येत आहे.

‘BUDDHISM A-Z’ हे पुस्तक आणि चार्ट मिळवण्यासाठी प्रा. धनराज इंगोले यांच्याशी मोबाईल क्रमांक 8007289008 वर संपर्क साधावा. ते विरगव्हाण, पोस्ट लोणी, तालुका कारंजा लाड, जिल्हा वाशिम – 444105 येथील रहिवासी आहेत.
जाहिरात
वर्षावास आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
प्रबुद्ध टीव्हीद्वारे आयोजित
राज्यस्तरीय ऑनलाइन
धम्मज्ञान महापरीक्षा – 2026
धम्मविषयक ज्ञान वाढविण्यासाठी, वाचनाची सवय विकसित करण्यासाठी आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम.
परीक्षेची तारीख
01 नोव्हेंबर 2026
रविवार
परीक्षेची वेळ
दु. 01:30 ते 2:10
40 मिनिटे
नोंदणी शुल्क
₹120/-
अंतिम तारीख 25 ऑक्टोबर
परीक्षेचा अभ्यासक्रम
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील प्रथम चार खंडांवर आधारित प्रश्न.
40 प्रश्न | 200 गुण | बहुपर्यायी (MCQ) स्वरूप
एकूण पारितोषिक रक्कम
₹50,000/-
एकूण 7 पारितोषिके
पारितोषिकांचा तपशील
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी • खुली स्पर्धा • वयाचे बंधन नाही • मराठी भाषा

