‘क्रांतिकारी कट्टा’च्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा संकल्प
जातिभेद, विषमता आणि अंधश्रद्धेविरोधात साहित्य-संस्कृतीच्या माध्यमातून जनजागृती; गावविकास आणि पर्यावरण संवर्धनावरही भर
मुंबई : सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘क्रांतिकारी कट्टा’च्या माध्यमातून विद्रोही साहित्य व सांस्कृतिक चळवळ उभी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. कविता, गीत, नाटक आणि साहित्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता, अन्याय, शोषण आणि अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यावर या उपक्रमात भर दिला जाणार आहे.
संविधानिक मूल्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्रोही कविता, कवी संमेलने, जनजागृतीपर गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन आहे. नवोदित कवींना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि परिवर्तनवादी विचारांना व्यापक स्वरूप देणे, हेही या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

सामाजिक परिवर्तनासोबतच गावविकास आणि पर्यावरण संवर्धनालाही या उपक्रमात महत्त्व देण्यात आले आहे. गावातील स्वच्छता, पाणी संवर्धन, वृक्षसंवर्धन, जंगल संरक्षण आणि पर्यावरणविषयक जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘क्रांतिकारी कट्टा’चे संस्थापक विजय गुडेकर (उर्फ बादल), सहसंस्थापक वैभव मगर आणि सचिव राजेंद्र धायजे आहेत. विजय गुडेकर आणि राजेंद्र धायजे हे मुंबई येथील, तर वैभव मगर हे नाशिक येथील आहेत.
केवळ विचार मांडण्यापुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष कृतीत उतरविणे, ही या उपक्रमामागील भूमिका आहे. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक कार्य यांच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या चळवळीतून केला जाणार आहे.
‘क्रांतिकारी कट्टा’चे सहसंस्थापक वैभव मगर यांनी प्रबुद्ध टीव्हीशी संवाद साधताना या उपक्रमाची माहिती दिली. सामाजिक प्रबोधन, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून परिवर्तनवादी विचारांना कृतीची जोड देण्याचा या उपक्रमाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
जाहिरात
वर्षावास आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
प्रबुद्ध टीव्हीद्वारे आयोजित
राज्यस्तरीय ऑनलाइन
धम्मज्ञान महापरीक्षा – 2026
धम्मविषयक ज्ञान वाढविण्यासाठी, वाचनाची सवय विकसित करण्यासाठी आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम.
परीक्षेची तारीख
01 नोव्हेंबर 2026
रविवार
परीक्षेची वेळ
दु. 01:30 ते 2:10
40 मिनिटे
नोंदणी शुल्क
₹120/-
अंतिम तारीख 25 ऑक्टोबर
परीक्षेचा अभ्यासक्रम
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील प्रथम चार खंडांवर आधारित प्रश्न.
40 प्रश्न | 200 गुण | बहुपर्यायी (MCQ) स्वरूप
एकूण पारितोषिक रक्कम
₹50,000/-
एकूण 7 पारितोषिके
पारितोषिकांचा तपशील
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी • खुली स्पर्धा • वयाचे बंधन नाही • मराठी भाषा

