विशाल केदार यांची शिवशाही प्रतिष्ठानच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; सामाजिक कार्याला गती देण्याची जबाबदारी

साक्री, जि. धुळे (24/10/2026) : शिवशाही प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यात सक्रिय असलेले विशाल केदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राज गोविंद जाधव यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विशाल केदार हे ऑल इंडिया पँथर सेना, साक्री तालुका अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी जपत वंचित, शोषित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांसाठी काम करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे तसेच समाजात समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये रुजवणे, हा त्यांच्या सामाजिक कार्याचा उद्देश असल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शिवशाही प्रतिष्ठानच्या धुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात संघटनेचे कार्य मजबूत करणे आणि सामाजिक तसेच जनहिताच्या उपक्रमांना चालना देणे, यावर त्यांना भर द्यावा लागणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल विशाल केदार यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
जाहिरात
वर्षावास आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
प्रबुद्ध टीव्हीद्वारे आयोजित
राज्यस्तरीय ऑनलाइन
धम्मज्ञान महापरीक्षा – 2026
धम्मविषयक ज्ञान वाढविण्यासाठी, वाचनाची सवय विकसित करण्यासाठी आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणारा उपक्रम.
परीक्षेची तारीख
01 नोव्हेंबर 2026
रविवार
परीक्षेची वेळ
दु. 01:30 ते 2:10
40 मिनिटे
नोंदणी शुल्क
₹120/-
अंतिम तारीख 25 ऑक्टोबर
परीक्षेचा अभ्यासक्रम
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातील प्रथम चार खंडांवर आधारित प्रश्न.
40 प्रश्न | 200 गुण | बहुपर्यायी (MCQ) स्वरूप
एकूण पारितोषिक रक्कम
₹50,000/-
एकूण 7 पारितोषिके
पारितोषिकांचा तपशील
सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी • खुली स्पर्धा • वयाचे बंधन नाही • मराठी भाषा

