प्रबुद्ध टीव्ही — डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बुद्ध धम्म, संविधान जागृती आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत डिजिटल माध्यम.
JOURNALISM • SOCIAL AWARENESS
प्रबुद्ध टीव्ही
Prabuddha TV
पत्रकारिता • प्रबोधन • सामाजिक चळवळी • ज्ञानसंपदा
२०१७ पासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि धार्मिक विषयांवर सातत्याने कार्यरत असलेले डिजिटल माध्यम.
स्थापना
२०१७
कार्यक्षेत्राचे केंद्र
अकोला, महाराष्ट्र
YouTube समुदाय
1.70 लाख+
या लेखातील प्रमुख विभाग
01 / ओळख
प्रबुद्ध टीव्ही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेत, एखादी चळवळ प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी आणि तिचे विचार, प्रश्न व उद्दिष्टे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र माध्यमाची आवश्यकता ओळखून प्रबुद्ध टीव्ही (Prabuddha TV) कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

अकोला, महाराष्ट्र येथून २०१७ मध्ये सुरू झालेला प्रबुद्ध टीव्ही हा स्वतंत्र डिजिटल माध्यम उपक्रम आहे. बुद्ध-आंबेडकरवादी विचारधारा, आंबेडकरी चळवळ, बौद्ध ऐतिहासिक स्थळे आणि समाजाच्या प्रश्नांना मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये अनेकदा अपेक्षित स्थान मिळत नाही. ही पोकळी भरून काढण्याची गरज ओळखून प्रबुद्ध टीव्ही जाणीवपूर्वक या विषयांना प्राधान्य देत आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून दुर्लक्षित राहणाऱ्या घडामोडी समाजासमोर आणणे, ऐतिहासिक स्थळांची माहिती पोहोचवणे आणि महत्त्वाच्या कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण करणे, हे प्रबुद्ध टीव्हीच्या कार्याचे महत्त्वाचे भाग आहेत.
डिजिटल पत्रकारिता, बातम्या, सामाजिक चळवळींचे वार्तांकन, लाईव्ह प्रक्षेपण, मुलाखती, पॉडकास्ट, ग्रंथवाचन, भारतीय संविधानाचा अभ्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे विश्लेषण, बुद्ध धम्मविषयक माहिती आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रबुद्ध टीव्ही समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. वेबसाइट, YouTube, सोशल मीडिया आणि Android ॲपच्या माध्यमातून हे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवले जात आहे.
विशेष म्हणजे, आजपर्यंत प्रबुद्ध टीव्हीला या कामासाठी कोणतेही प्रायोजकत्व किंवा जाहिरातींच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळालेले नाही. तरीही या कार्याची सामाजिक गरज आणि महत्त्व लक्षात घेऊन, इतर उपक्रमांतून मिळणाऱ्या उत्पन्नातून खर्च वजा केल्यानंतर जी थोडीफार रक्कम शिल्लक राहते, त्यातून प्रबुद्ध टीव्हीचे हे कार्य सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे काम केवळ आर्थिक लाभासाठी नसून, आंबेडकरी चळवळीचा आवाज समाजापर्यंत पोहोचावा, बुद्ध-आंबेडकरवादी विचारांचा प्रसार व्हावा, दुर्लक्षित प्रश्नांना अभिव्यक्ती मिळावी आणि चळवळीतील महत्त्वाच्या घटनांचे दस्तऐवजीकरण व्हावे, या सामाजिक बांधिलकीतून केले जात आहे.
प्रबुद्ध टीव्ही — आंबेडकरी चळवळीचा आवाज, बुद्ध-आंबेडकरवादी विचारांचे माध्यम आणि सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीचे डिजिटल दस्तऐवजीकरण.
प्रबुद्ध टीव्हीची कार्यदिशा
माहिती, इतिहास, विचार आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे.
सामाजिक प्रश्नांचे वार्तांकन आणि ज्ञानाधारित डिजिटल सामग्री या दोन्ही बाबींना महत्त्व.
02 / विशेष कार्यक्षेत्र
महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण
प्रबुद्ध टीव्हीच्या प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक म्हणजे महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आणि घटनास्थळावरील वार्तांकन. मोठ्या कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित राहता न येणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत कार्यक्रमातील दृश्ये, भाषणे आणि महत्त्वाच्या घडामोडी पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.
नागपूर, महाराष्ट्र
दीक्षाभूमी
धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांशी संबंधित थेट प्रक्षेपण व वार्तांकन.
मुंबई, महाराष्ट्र
चैत्यभूमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचे वार्तांकन आणि थेट प्रक्षेपण.
ऐतिहासिक स्थळ
भीमा कोरेगाव
ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांशी संबंधित दृश्ये व घडामोडी.
महू, मध्य प्रदेश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित स्थळावरील कार्यक्रम आणि महत्त्वाच्या घडामोडी.
इतर सार्वजनिक कार्यक्रम
इतर उपक्रम
सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांचे वार्तांकन व डिजिटल प्रसारण.
थेट प्रक्षेपण का महत्त्वाचे?
आपल्याला माहिती आहे की, बुद्ध-आंबेडकरवादी विचारधारा, ऐतिहासिक स्थळे आणि आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाच्या घडामोडींना मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये अपेक्षित स्थान मिळत नाही. अशा वेळी निर्माण झालेली ही उणीव भरून काढण्यासाठी प्रबुद्ध टीव्ही आवर्जून अशा ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण करते. मुख्य प्रवाहातील माध्यमे जिथे आपल्या समाजाचे प्रश्न, बौद्ध स्थळे आणि आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाच्या घडामोडी दाखवण्याकडे दुर्लक्ष करतात, तिथे प्रबुद्ध टीव्ही ठामपणे उभे राहून या सर्व गोष्टी समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करते.
03 / प्रवास
२०१७ पासून सातत्यपूर्ण डिजिटल प्रवास
प्रबुद्ध टीव्हीची सुरुवात २०१७ मध्ये झाली. विद्यार्थी असतानाच प्रवीण दीपक जामनिक यांनी YouTube चॅनेल सुरू केले. सुरुवातीपासून सातत्याने काम करत या उपक्रमाचा विस्तार डिजिटल पत्रकारिता, सामाजिक विषयांचे वार्तांकन, व्हिडिओ निर्मिती आणि विविध ऑनलाइन उपक्रमांपर्यंत झाला.
गेल्या नऊ वर्षांपासून प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातील घडामोडी, वैचारिक विषय आणि जनआंदोलनांशी संबंधित सामग्री लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे.
२०१७
YouTube चॅनेलची सुरुवात
विद्यार्थीदशेत प्रवीण दीपक जामनिक यांनी डिजिटल माध्यमातून माहिती आणि वैचारिक सामग्री लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास सुरू केला.
सातत्यपूर्ण कार्य
सामाजिक विषयांवर भर
सामाजिक घडामोडी, जनआंदोलने, सार्वजनिक कार्यक्रम आणि वैचारिक विषयांचे वार्तांकन सातत्याने सुरू ठेवले.
डिजिटल विस्तार
वेबसाइट, ॲप आणि सोशल मीडिया
YouTube चॅनेलसोबत वेबसाइट, Android ॲप आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवरही सामग्री उपलब्ध झाली.
YouTube
1.70 लाख+
सबस्क्राइबर्स
45,000+
फॉलोवर्स
25,000+
फॉलोवर्स
04 / विशेष सामाजिक वार्तांकन
बीड ते मुंबई लाँग मार्च — २०२६
अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर जून २०२६ मध्ये बीड ते मुंबई असा लाँग मार्च आयोजित करण्यात आला होता. या आंदोलनातील घडामोडी, सहभागी नागरिकांचा प्रवास आणि आंदोलनाशी संबंधित माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल वार्तांकन महत्त्वाचे ठरले.
प्रबुद्ध टीव्हीने या मोहिमेच्या सोशल मीडिया प्रसारातून महाराष्ट्रभर सुमारे ७० लाख लोकांपर्यंत पोहोचल्याची माहिती दिली होती. हा आकडा त्या मोहिमेच्या संदर्भातील पोहोच दर्शवतो.
मोहिमेची नोंद
70 लाख
सोशल मीडियावर मोहिमेदरम्यान पोहोचल्याची नोंदवलेली संख्या.
05 / ज्ञानसंपदा
प्रबुद्ध टीव्ही ॲप — ज्ञानाचा विस्तृत संग्रह
प्रबुद्ध टीव्हीचे कार्य केवळ बातम्या आणि थेट प्रक्षेपणापुरते मर्यादित नाही. ॲप आणि डिजिटल चॅनेलच्या माध्यमातून संविधान, इतिहास, बुद्ध धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य, प्रबोधनात्मक व्हिडिओ, ग्रंथवाचन, पॉडकास्ट आणि विविध विषयांवरील तज्ज्ञांच्या मुलाखतीही उपलब्ध करून दिल्या जातात.
विद्यार्थी, अभ्यासक, वाचक आणि सामाजिक विषयांमध्ये रस असणाऱ्या नागरिकांना विविध विषयांवरील सामग्री एकाच ठिकाणी पाहता यावी, हा या ज्ञानसंपदेचा महत्त्वाचा उपयोग आहे.
CONSTITUTION
समग्र संविधान
भारतीय संविधान आणि त्यातील विविध तरतुदी समजून घेण्यासाठी तयार केलेली ४० व्हिडिओंची मालिका.
AMBEDKARITE LITERATURE
आंबेडकरी साहित्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखित ग्रंथांवर आधारित अभ्यास, विश्लेषण आणि वैचारिक सामग्री.
DHAMMA
धम्म
बुद्ध धम्माचा इतिहास, धम्मविषयक ग्रंथ, भिक्खू संघाचे व्हिडिओ आणि धम्माशी संबंधित कार्यक्रम.
HISTORY & CULTURE
इतिहास आणि संस्कृती
भारतीय इतिहास, लेणी, शिल्पकला, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांवरील माहिती.
PODCASTS & INTERVIEWS
पॉडकास्ट आणि मुलाखती
विविध विषयांतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि संबंधित व्यक्तींच्या मुलाखती, चर्चा आणि व्हिडिओ.
EDUCATIONAL CONTENT
शैक्षणिक सामग्री
अभ्यास, वाचन, ग्रंथपठन, ज्ञानवृद्धी आणि विविध शैक्षणिक विषयांशी संबंधित व्हिडिओ.
06 / विशेष शैक्षणिक मालिका
समग्र संविधान — ४० व्हिडिओंची अभ्यासमालिका
भारतीय संविधान समजून घेण्यासाठी प्रबुद्ध टीव्ही ॲपवर समग्र संविधान ही ४० व्हिडिओंची मालिका उपलब्ध आहे. संविधानातील विविध विषय आणि तरतुदींचे सविस्तर स्पष्टीकरण समजून घेण्यासाठी ही मालिका तयार करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधाननिर्मितीतील योगदान, संविधानाची रचना, विविध तरतुदी आणि संविधानाशी संबंधित संकल्पना समजून घेण्यासाठी या मालिकेचा उपयोग करता येतो.
व्हिडिओंची संख्या
४०
मुख्य विषय
भारतीय संविधान
ही मालिका पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करून Prabuddha TV ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या संबंधित विभागातून समग्र संविधान मालिका शोधा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांवरील अभ्यास आणि विश्लेषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास सामाजिक इतिहास, जातिव्यवस्था, समता, लोकशाही आणि बुद्ध धम्म यांसारखे विषय समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रबुद्ध टीव्हीवर त्यांच्या ग्रंथांशी संबंधित अभ्यासपूर्ण व्हिडिओ आणि विश्लेषणात्मक सामग्री सादर केली जाते.
07 / सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम
धम्मशिबिरे, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि ग्रंथपठन
सामाजिक आणि वैचारिक विषयांबरोबरच प्रबुद्ध टीव्हीवर धम्मविषयक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे व्हिडिओही सादर केले जातात. या सामग्रीतून प्रेक्षकांना विविध कार्यक्रमांचा परिचय मिळतो.
धम्मशिबिरे
धम्मविषयक अध्ययन, प्रशिक्षण आणि शिबिरांशी संबंधित कार्यक्रमांचे व्हिडिओ.
सामनेर शिबिरे
शामनेर प्रशिक्षण शिबिरांशी संबंधित कार्यक्रम आणि उपलब्ध दृश्य सामग्री.
प्रबोधनात्मक गीतगायन
सामाजिक जागृती, समता आणि वैचारिक प्रबोधनाशी संबंधित गीतांचे कार्यक्रम.
प्रबोधनाचे कार्यक्रम
व्याख्याने, सामाजिक चर्चा, सार्वजनिक सभा आणि प्रबोधनात्मक उपक्रम.
ग्रंथपठन
विविध ग्रंथांचे वाचन, साहित्याचा परिचय आणि अभ्यासाशी संबंधित सामग्री.
भिक्खू संघाचे व्हिडिओ
भिक्खू संघाशी संबंधित धम्मविषयक कार्यक्रम, प्रवचने आणि उपलब्ध व्हिडिओ.
बुद्ध धम्माचा इतिहास, भारतातील लेणी आणि ऐतिहासिक स्थळे
बुद्ध धम्माचा इतिहास समजून घेण्यासाठी ऐतिहासिक स्थळे, लेणी, शिल्पकला, सांस्कृतिक वारसा आणि संबंधित ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. प्रबुद्ध टीव्हीच्या व्ह्लॉग्समधून अशा ठिकाणांची दृश्ये आणि त्यांच्याशी संबंधित माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते.
या प्रवासात नेपाळ तसेच उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील विविध स्थळांना भेटी देऊन धम्माचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक संदर्भांशी संबंधित सामग्री सादर करण्यात आली आहे.
प्रवास
नेपाळ
धम्म आणि ऐतिहासिक वारशाशी संबंधित स्थळे.
इतिहास
उत्तर प्रदेश
बुद्धांच्या जीवनाशी आणि धम्माच्या इतिहासाशी संबंधित प्रदेश.
धम्म वारसा
बिहार
ऐतिहासिक आणि बौद्ध वारशाशी संबंधित स्थळे.
स्थळदर्शन
मध्य प्रदेश
ऐतिहासिक स्थळे, शिल्प आणि सांस्कृतिक वारसा.
भारतातील बौद्ध लेणी, ऐतिहासिक वास्तू, शिल्पकला आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित व्हिडिओंच्या माध्यमातून प्रेक्षकांना स्थळांचा दृश्य परिचय मिळतो.
08 / संवाद आणि विचार
पॉडकास्ट, तज्ज्ञांच्या मुलाखती आणि व्हिडिओ
विविध विषयांतील तज्ज्ञ, अभ्यासक आणि संबंधित व्यक्तींचे अनुभव व विचार जाणून घेण्यासाठी मुलाखती आणि पॉडकास्ट महत्त्वाचे ठरतात. प्रबुद्ध टीव्हीवर विविध विषयांवरील चर्चा, मुलाखती आणि माहितीपर व्हिडिओ उपलब्ध आहेत.
तज्ज्ञांशी संवाद
विविध विषयांतील जाणकारांच्या मुलाखतींमधून त्यांच्या अनुभवांचा आणि अभ्यासाचा परिचय मिळतो.
विषयाधारित पॉडकास्ट
सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैचारिक विषयांवर चर्चा व माहिती.
व्हिडिओ आणि चर्चासत्रे
ग्रंथ, इतिहास, बुद्ध धम्म आणि समाजाशी संबंधित विषय समजून घेण्यासाठी दृश्य सामग्री.
या विविध स्वरूपांमुळे प्रबुद्ध टीव्हीचे डिजिटल माध्यम केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता माहिती, अभ्यास आणि वैचारिक संवादासाठीही उपयोगी ठरते.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्य
प्रबुद्ध टीव्हीच्या कार्यामध्ये समाजातील विविध विषयांचा समावेश होतो. सामाजिक न्याय आणि जनआंदोलनांशी संबंधित वार्तांकनासोबत शैक्षणिक सामग्री, सांस्कृतिक कार्यक्रम, बुद्ध धम्म, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा आणि वैचारिक चर्चांनाही स्थान दिले जाते.
सामाजिक
जनआंदोलने, सार्वजनिक प्रश्न आणि सामाजिक न्याय.
शैक्षणिक
अभ्यासमालिका, ऑनलाइन परीक्षा आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ.
सांस्कृतिक
कार्यक्रम, सांस्कृतिक वारसा आणि इतिहासाशी संबंधित सामग्री.
वैचारिक
ग्रंथविश्लेषण, मुलाखती आणि विषयाधारित चर्चा.
धार्मिक
बुद्ध धम्म, धम्मशिबिरे आणि संबंधित सार्वजनिक कार्यक्रम.
10 / WEBSITES
प्रबुद्ध टीव्हीची संकेतस्थळे
प्रबुद्ध टीव्हीची न्यूज वेबसाइट आणि अधिकृत माहितीविषयक वेबसाइट अशा दोन स्वतंत्र डिजिटल ठिकाणांद्वारे वाचकांना संबंधित माहिती मिळवता येते.
11 / ANDROID APPLICATION
Prabuddha TV Android ॲप
प्रबुद्ध टीव्हीचे Android ॲप हे व्हिडिओ, उपलब्ध शैक्षणिक सामग्री आणि इतर डिजिटल सुविधांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे. ॲपमध्ये उपलब्ध विभागांनुसार वापरकर्त्यांना संबंधित सामग्री पाहता येते.
ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा. Google Play Store वरील ॲप पेज उघडल्यानंतर Install या पर्यायावर क्लिक करून ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
12 / ONLINE EXAMINATIONS
प्रबुद्ध टीव्हीच्या ऑनलाइन परीक्षांची माहिती
प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून संविधान, बुद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याशी संबंधित ऑनलाइन शैक्षणिक परीक्षा आयोजित केल्या जातात. परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, पात्रता, शुल्क, नावनोंदणी, परीक्षा वेळापत्रक आणि निकाल यांसंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी वेबसाइटवरील परीक्षा विभागाला भेट द्या.
परीक्षेत सहभागी होण्याची इच्छा असल्यास प्रथम संबंधित परीक्षेची अधिकृत माहिती वाचावी आणि त्यानंतर दिलेल्या सूचनांनुसार नावनोंदणी करावी.
परीक्षा विभागात काय पाहता येईल?
- परीक्षेचे नाव आणि उद्देश.
- अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती.
- शुल्क आणि नावनोंदणीची माहिती.
- परीक्षेची तारीख, वेळ आणि सूचना.
- निकाल आणि पारितोषिकांशी संबंधित तपशील.
13 / FOUNDER & LEADERSHIP
प्रवीण दीपक जामनिक — संस्थापक आणि संचालक
प्रवीण दीपक जामनिक यांनी विद्यार्थी असतानाच २०१७ मध्ये YouTube चॅनेल सुरू केले. त्यानंतर सातत्याने डिजिटल माध्यमांवर काम करत प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून सामाजिक विषयांचे वार्तांकन, वैचारिक सामग्री, शैक्षणिक उपक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे प्रसारण यांचा विस्तार केला.
गेल्या नऊ वर्षांपासून ते प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. पत्रकारिता, डिजिटल सामग्री निर्मिती, सोशल मीडिया व्यवस्थापन आणि विविध कार्यक्रमांचे डिजिटल प्रसारण या क्षेत्रांतील त्यांचा अनुभव प्रबुद्ध टीव्हीच्या कार्याशी संबंधित आहे.
EDUCATION & EXPERIENCE
शिक्षण आणि अनुभव
पदवी
B.Sc. — Bachelor of Science
पदव्युत्तर शिक्षण
M.A. in Journalism and Mass Communication
पत्रकारिता आणि जनसंवादातील पदव्युत्तर शिक्षण.
डिजिटल आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव
९ वर्षे
२०१७ पासून प्रबुद्ध टीव्हीच्या माध्यमातून सातत्यपूर्ण कार्य.
विद्यार्थीदशेत सुरू केलेल्या डिजिटल उपक्रमाला सातत्याने पुढे नेऊन प्रबुद्ध टीव्हीला विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे.
14 / CONTACT
प्रबुद्ध टीव्हीशी संपर्क साधा
प्रबुद्ध टीव्हीच्या डिजिटल माध्यमांशी, उपलब्ध उपक्रमांशी किंवा इतर माहितीशी संबंधित चौकशीसाठी खालील संपर्क तपशील वापरा.
PRABUDDHA TV
माहितीपासून ज्ञानापर्यंतचा प्रवास
बातम्या, थेट प्रक्षेपण, सामाजिक चळवळी, संविधानाची मालिका, बुद्ध धम्म, ग्रंथपठन, पॉडकास्ट आणि शैक्षणिक सामग्री पाहण्यासाठी प्रबुद्ध टीव्हीच्या अधिकृत डिजिटल माध्यमांशी जोडलेले राहा.
